Bachchu Kadu Join Shivsena : अखेर बच्चू कडूंच्या हाती धनुष्यबाण आलेच; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर आज म्हणजेच गुरुवार ३० एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यानंतर त्यांना विधान परिषदेची संधी देऊ अशी अट घालण्यात आली होती. यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला.

झेंडा बदलला तरी अजेंडा तोच आहे :


मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी पक्षात प्रवेश घेतला आहे. भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करू. फक्त आमदारकीसाठी नव्हे तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच आहे. शिवसेनेचे राजकारण आणखी मजबूत करू. राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू असा शब्द बच्चू कडू यांनी पक्षप्रवेशावेळी दिला.



या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बच्चू कडू मूळचे शिवसैनिकच आहेत. आज ते पुन्हा स्वगृही आलेत. असं म्हणत त्यांचं स्वागत केलं.


नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे ?


एक कडवट कार्यकर्ता, सर्वसामान्यांसाठी झटणारा, दिव्यांगासाठी लढणारा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा त्यांची ताकद पाहिली. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, कर्जमाफीचा निर्णय घेऊन त्या आंदोलनाला यश आले. दिव्यांगासाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. आज त्यांचे शिवसेनेत स्वागत करतो. बच्चू कडू मूळचे शिवसैनिकच आहेत. २५ वर्ष प्रहार संघटनेचे काम केले आणि त्यानंतर आज पुन्हा स्वगृही आलेत. मुद्दे, ध्येयधोरणे, गोरगरिबांना न्याय देणारे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी सत्तेचे बळ लागते. बच्चू कडू आणि शिवसेना समीकरण नवीन नाही. लढवय्या कार्यकर्ता आज आपल्यात आलेत. आपली लढाई विचारांची आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझीही आणि त्यांचीही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होतो असं सांगत एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचे पक्षात स्वागत केले.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण