Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक ०१/०२.०५.२०२६ आणि ०२/०३.०५.२०२६ रोजी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स


मध्य रेल्वे, मुंबई विभागाकडून कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) अतिक्रमण कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:


दिनांक ०१/०२.०५.२०२६ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र) आणि ०२/०३.०५.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्र)



ब्लॉकचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:


ब्लॉक- ए


ब्लॉकची तारीख: ०१/०२.०५.२०२६ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र)
ब्लॉक कालावधी: ०२.०५.२०२६ रोजी ०१.४० ते ०३.४० वाजेपर्यंत
ब्लॉक विभाग: कल्याण ते अंबरनाथ दरम्यान अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्ग (दोन्ही स्थानके वगळून)


ब्लॉक- बी


ब्लॉकची तारीख: ०२/०३.०५.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्र)
ब्लॉक कालावधी: ०३.०५.२०२६ रोजी ०१.३० ते ०३.३० वाजेपर्यंत
ब्लॉक विभाग: अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान डाउन दक्षिण-पूर्व मार्ग (अंबरनाथ वगळून व बदलापूर समाविष्ट)



ब्लॉकमुळे होणारे परिणाम पुढीलप्रमाणे असतील:


उपनगरी गाड्यांचे संचालन:
ब्लॉक कालावधीत कल्याण ते बदलापूर दरम्यान उपनगरी सेवा पूर्णतः रद्द राहील.


पहिली व शेवटची लोकल


०१/०२.०५.२०२६ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र):
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल BL61 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –बदलापूर, जी ०१.०५.२०२६ रोजी २३.५१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल S4 कर्जत–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , जी ०२.०५.२०२६ रोजी ०३.३५ वाजता कर्जत येथून सुटेल.


०२/०३.०५.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्र):
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल S41 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –कर्जत, जी ०२.०५.२०२६ रोजी २३.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल S4 कर्जत–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , जी ०३.०५.२०२६ रोजी ०३.३५ वाजता कर्जत येथून सुटेल.



मेल/एक्सप्रेस गाड्यांचे संचालन:


खालील गाड्या ०१.०५.२०२६ व ०२.०५.२०२६ रोजी कर्जत – पनवेल मार्गे वळविण्यात येतील:


गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस.
गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस


कल्याण येथे नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल व ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात येईल.


उशिरा धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस/हॉलिडे विशेष गाड्या आवश्यकतेनुसार वळविण्यात किंवा नियमन करण्यात येतील.


हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल व सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने