Neelam Gorhe Shivsena : नीलम गोऱ्हेना शिवसेनेतच विरोध? तरीही शिंदेनी दिली उमेदवारी; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकीची धांदल आता सुरु झाली आहे. आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश शिवसेनेत झाला, आणि शिवसेनेकडून बच्चू कडू सोबतच नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.



शिवसेनेतच नीलम गोऱ्हेना विरोध


अनेक दिवसांपासून विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शिवसेनेतीलच काही नेत्यांचा नीलम गोऱ्हे यांना विरोध होता. विधान परिषदेसाठी उमेदवारांची नावे शिवसेना जाहीर करण्याआधीच बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश शिवसेनेत झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.



पण हळूहळू शिवसेनेतच नीलम गोऱ्हे यांच्या नावाबाबत फूट पडताना दिसत होती. राज्यसभेप्रमाणेच नवा चेहरा विधानसभेसाठी मिळावा असा अनेकांचा आग्रह होता. अनेकांनी नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत विरोध दर्शवला होता, परंतु एकनाथ शिंदे यांनी हा विरोध झुगारून नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत, या निर्णयामुळे शिवसेनेत फुट पडणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.



यावर एकनाथ शिंदेनी काय उत्तर दिलय ?


पद ही कमी असतात आणि जे योग्य काम करतात त्यांनाच ती पद मिळतात, माझं प्रत्येकावर लक्ष आहे. जो काम करेल तो पुढे जाईल. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मालकांचा नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय बच्चू कडू यांचे स्वागत करताना देखील शिंदे म्हणाले की, "दिव्यांगांसाठी झटणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे, शिवसेनेत तुमचं स्वागत आहे, मुळात शिवसेना तुम्हाला नवीन नाही, तुम्ही मुळात शिवसैनिक आहात, याचसोबतच महायुतीचे सर्व उमेदवार निवडूनही येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने