Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2 मे रोजी म्हणजेच शनिवारी २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करणार आहे.



संघ निवडीनंतर, कर्णधार हरमनप्रीत कौर, मुख्य निवडकर्ता अस्मिता शर्मा आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकिया एका पत्रकार परिषदेत संघांची घोषणा करतील. निवड समिती २८ मे ते २ जून दरम्यान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी, १० ते १३ जुलै दरम्यान लॉर्ड्सवर होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी आणि इंग्लंड 'अ' संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत 'अ' संघाची निवड करेल.



भारताला २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकाच्या गट १ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाचा सामना सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स या संघांशी होणार आहे


भारताच्या तयारीबद्दल बोलायचे झाल्यास, संघाने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका १-४ ने गमावली आहे, ही चिंतेची बाब आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात झालेल्या २०२० च्या महिला टी-२० विश्वचषकात उपविजेता ठरला होता. पण या प्रकारात त्यांना अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही. २०२५ मध्ये मायदेशात महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि यावेळी विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. दरम्यान, यजमान इंग्लंडने २८ एप्रिल रोजी आपला संघ जाहीर केला, तर गतविजेत्या न्यूझीलंडनेही आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यावर्षी प्रथमच या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार असून, सात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ३३ सामने खेळले जाणार आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने