NEET UG परीक्षेसाठी मेगाब्लॉकच्या नियोजनात बदल, जाणून घ्या कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक ?

मुंबई : नीट युजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉकच्या नियोजनात बदल केला आहे. शनिवारी-रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप - डाऊन धीम्या मार्गांवर रविवारी रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ या वेळेत ब्लॉक आहे.


सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. घाटकोपरकडून येणाऱ्या अप गाड्यांनाही याच पद्धतीने जलद मार्गावर वळवून प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.


डाऊनची शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१६ वाजता सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी सुटेल तर अपची शेवटची लोकल कल्याणहून शनिवारी रात्री १०.२२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाराकडे पहिली लोकल रविवारी पहाटे ५.०७ वाजता, तर टिटवाळाहून सीएसएमटीकडे पहिली लोकल रविवारी पहाटे ४.१२ वाजता सुटणार आहे.


ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ या वेळेत अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक असल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. या कालावधीत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकपूर्वी ठाणे-पनवेल शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१४ वाजता सुटेल, तर वाशीहून ठाण्याकडे शेवटची गाडी शनिवारी रात्री १०.४५ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर ठाण्याहून पनवेलसाठी पहिली लोकल पहाटे ५.१२ वाजता, तर पनवेलहून ठाण्यासाठी पहाटे ४.३३ वाजता सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन