International Drug Racket Busted : ‘ऑपरेशन क्लीन मुंबई’! १७४५ कोटींचं कोकेन जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईत धडक कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ३४९ किलो हायग्रेड कोकेन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १७४५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या मोठ्या यशामुळे देशातील अंमली पदार्थविरोधी लढ्यात मोठी कामगिरी मानली जात आहे.


या प्रकरणाची माहिती स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांनी या कारवाईचे कौतुक करत स्पष्ट केले की, देशात ड्रग्स तस्करीविरोधात सरकारचा लढा अधिक तीव्र करण्यात आला आहे.



अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अंमली पदार्थांच्या तस्करीची साखळी मोडून काढण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. मुंबईतील या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कोकेन जप्त करण्यात आले असून, छोट्या साठ्याच्या तपासातून संपूर्ण आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघडकीस आणण्यात आले आहे. ही ‘बॉटम टू टॉप’ कारवाईचे उत्तम उदाहरण आहे.” त्यांनी एनसीबीच्या पथकाचे अभिनंदनही केले.





तपासाची दिशा बदलली :


सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला एका छोट्या ड्रग्स साठ्याचा तपास करताना एनसीबीला या मोठ्या रॅकेटचा मागोवा लागला. त्यानंतर साखळी तपास करत मोठ्या प्रमाणावर कोकेन जप्त करण्यात आले. या प्रकरणात अनेक आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



आंतरराष्ट्रीय जाळ्याचा संशय :


जप्त करण्यात आलेले कोकेन परदेशातून भारतात तस्करी करून आणण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामागे मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी सुरू आहे.



देशात ड्रग्सविरोधी कारवाई तीव्र :


गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीकडून देशभरात ड्रग्सविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत. मुंबई, गोवा, गुजरात आणि इतर किनारपट्टी भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.


या कारवाईमुळे केवळ मोठा ड्रग्स साठा जप्त झाला नसून, देशात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने