HSC Result : राज्याचा बारावीचा निकाल शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल ॲानलाईन जाहीर होणार असून शनिवारी, दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मुंबईतून सुमारे तीन लाख ५० हजार १५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यंदा राज्य शिक्षण मंडळाने १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान राज्यभरात परीक्षा घेतल्या. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुंबईतून तीन लाख ५० हजार १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांना आता २ मे रोजी दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.


गुणपडताळणीसाठी ३ मेपासून अर्ज करता येणार : या निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास विद्यार्थी ३ ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी ॲानलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने स्पष्ट केले.


या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल : https://results.digilocker.gov.in , https://mahahsscboard.in , https://hscresult.mkcl.org , https://results.targetpublications.org , https://results.navneet.com , https://www.tv9marathi.com

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन