Marathi Conversation Guide : रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी संवाद मार्गदर्शिका

मुंबई : महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी भाषेत संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषा न आल्यास परवाने तात्काळ रद्द करण्याच्या नियमाला स्थगिती दिली आहे. परंतु परिवहन विभागाने ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी अधिक चांगल्या प्रकारे वागण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी एक विशेष निर्देश जारी केला आहे. परिवहन विभागाने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी बोलण्याचा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार चालकांनी महिलांना ‘ताई-मावशी’ आणि पुरुष प्रवाशांना ‘भाऊ-काका’ म्हणून संबोधणे अनिवार्य आहे. आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी एक संभाषण मार्गदर्शिका विकसित करण्यात आली आहे. यामध्ये ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातील दैनंदिन संभाषणांचे मराठी तसेच हिंदीमध्ये वर्णन केले आहे.


प्रवाशांना सेवा देताना कसे बोलावे आणि कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महिलांना ‘ताई-मावशी’ आणि पुरुषांना 'भाऊ-काका' म्हणून संबोधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा उपक्रम प्रवाशांना, विशेषतः महिलांना, सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. परिवहन विभागाने मराठी भाषा विभाग आणि विविध साहित्यिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे.



रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी मंत्र’; संवाद होणार अधिक सुसंस्कृत


मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि प्रवाशांचा विश्वास संपादन करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. नम्रपणे आणि मराठीत बोलून प्रवासी सेवा सुधारण्यासाठी ही संवाद मार्गदर्शिका विकसित करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र माझी मराठी माझी बोलली भाषा!’ या भावनेने तयार केलेल्या या उपक्रमाचा उद्देश प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद सोपा, नम्र आणि स्पष्ट करणे हा आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक