सख्खा भाऊ झाला पक्का वैरी ! डोक्यात फरशी घालून धाकट्या भावाची निर्घृण हत्या

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याची प्रचिती याठिकाणी आली आहे. मूळचे छत्तीसगड राज्यातील रहिवासी असलेले मात्र सध्या पोट भरण्यासाठी कोल्हापूरमध्ये आलेल्या मोठ्या भावाने धाकट्या भावाचा निर्घृण खून केला आहे. सख्ख्या भावानेच अशाप्रकारे हत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Crime)


सख्खा भाऊ झाला पक्का वैरी (Kolhapur Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि त्याचा मोठा भाऊ हे दोघेही मूळचे छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील रहिवाशी आहेत. काही महिन्यांपूर्वीच ते रोजगारासाठी कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम कामगार म्हणून आले होते. मलकापूर परिसरातील एका बांधकाम साईटवर ते वास्तव्यास होते. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास दोघा भावांमध्ये अचानक जोरदार वाद झाला. या वाद इतका टोकाला पोहोचला की त्याचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. रागाच्या भरात मोठ्या भावाने जवळच पडलेली फारशी उचलून लहान भावाच्या डोक्यात घातली. हा वार इतका भीषण होता की, लहान भावाचा जागीच मृत्यू झाला. (Kolhapur Crime)


आरोपी घटनास्थळावरून पसार (Kolhapur Crime)


स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. लहान भावाची हत्या केल्यानंतर आरोपी मोठा भाऊ घटनास्थळावरून पसार झाला आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.


हत्येचे कारण अस्पष्ट (Kolhapur Crime)


शाहूवाडी पोलिसांनी (Shahuwadi Police) याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. परराज्यातून आलेल्या या कामगारांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्षुल्लक कारणावरून हे टोकाचे पाऊल उचलले की यामागे काही जुना वाद होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण