वासरु दाखवतो म्हणून चिमुरडीला गोठ्यात नेलं अन्... 'त्या' सीसीटीव्ही फुटेजने अख्खं कुटुंब हादरलं; काय घडलं ?

पुणे : महाराष्ट्रात चाललंय काय ? विकृत मानसिकता केव्हा संपणार ? असा प्रश्न पडतो जेव्हा महिला अत्याचाराशी संबंधित घटना समोर येते. ८० वर्षाची आजी असो किंवा ४ वर्षीची चिमुरडी अनेक महिला मुली या विकृत मानसिकतेच्या शिकार झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. नसरापूर गावात एका ४ वर्षीय चिमुकलीवर एका 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची क्रूर हत्या केली आहे. (PUNE CRIME )


वासरू दाखवतो म्हणून चिमुकलीला गोठ्यात नेलं अन्...


४ वर्षाची चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच मुली सोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता मात्र साडेतीन वाजताच ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्ख कुटुंब हादरलं.


लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचलं


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, दगडाने ठेचून तीला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर तीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही (cctv) फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


नराधमाला आमच्या हातात द्या, गावकऱ्यांची मागणी


ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला आमच्या हातात द्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी आंदोलकांना स्वतः एसपी संदीप सिंग गिल यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिकांना रास्ता रोको स्थगित केला.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर