भोरनंतर पुण्यात आणखी एक संतापजनक घटना, तीन वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार करुन निर्घृण खून

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये हादरवणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. चाकणच्या (Chakan) म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या (Mahalunge South Police Station) हद्दीत तीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune crime news )


सोळा वर्षीय मुलाकडून किळसवाणा प्रकार


मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहार येथील रहिवासी असलेल्या एका सोळा वर्षे अल्पवयीन तरुणाने तीन वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी (Mahalunge South Police Station)  त्याला ताब्यात घेतलं आहे. मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेश मधील असून कामनिमित्तानं चाकण परिसरात वास्तव्यास होते. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. (Chakan Crime News)


चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार


दरम्यान, कालच भोर तालुक्यातील नरसापूरमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिला संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा राज्यभरात निषेध नोंदवला जात असतानाच पुन्हा एकदा आज पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार करुन त्याला संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत. (Bhor Crime News)


आरोपीला फाशी देण्याची मागणी


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे आणि सोबतच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचं काय करायचं ते बघून असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. (Bhor Crime News)



दरम्यान पुण्यात घडलेल्या या दोन्ही घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. आरोपींना कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या