Chhattisgarh Soldier News : छत्तीसगडमधील जवान शहीद; सुरुंग निकामी करण्याच्या कामादरम्यान मोठा स्फोट

छत्तीसगड : एकेकाळी नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात सुरुंग निकामी करण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला. या स्फोटात डीआरजीचे चार जवान शहीद झाले.


कांकेर- नारायणपूर सीमावर्ती भागात शोध मोहीम आणि सुरुंग निर्मूलन मोहीम राबवली जात असताना, जमिनीत पुरलेल्या आयईडीचा (Improvised Explosive Device) स्फोट झाला. यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. स्फोटात डीआरजीचे चार जवान गंभीर जखमी झाले. स्फोटामुळे जवानांना झालेल्या जखमा अतिशय गंभीर स्वरुपाच्या होत्या. यामुळे जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. रुग्णालयात जखमी जवानांनी प्राण सोडला.



गेल्या काही महिन्यांत अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. या नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बस्तरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि भूसुरुंग पेरून ठेवण्यात आले आहेत. ही स्फोटके शोधून ती निकामी करण्यासाठी जिल्हा पोलीस आणि डीआरजी जवानांची एक विशेष तुकडी छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘डी-माइनिंग’ मोहीम राबवत होती. याच दरम्यान स्फोट झाला अन् भीषण स्फोटामुळे जवान गंभीर जखमी झाले. रुग्णालय लांब होते. यामुळे जखमी जवानांना एअरलिफ्ट करण्यात आले. पण तरीही रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. उपचार सुरू असताना गंभीर जखमी झालेल्या डीआरजीच्या चार जवानांचा मृत्यू झाला, असे बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पट्टिलिंगम यांनी सांगितले.



या दुःखद घटनेत डीआरजी प्रभारी सुखराम वट्टी, कॉन्स्टेबल कृष्ण कोमरा, कॉन्स्टेबल संजय गडपाले आणि कॉन्स्टेबल परमानंद कोरम हे जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर अधिक खबरदारी घेऊन जमिनीत पुरलेली स्फोटके निकामी करण्याचे काम करण्याचा निर्णय झाला आहे.







Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा