HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा दरवर्षी घेण्यात येते आणि यंदाच्या परीक्षेचा अखेर आज निकाल लागला आहे.


याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत १२ वीच्या निकालाबाबत माहिती दिली. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्याचा निकाल ८९.७९टक्के लागला आहे, तर कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांनी अव्वल स्थानावर आहे.  तर लातूर विभागाचा निकाल तुलनेत कमी म्हणजे 84.14 टक्के इतका आहे.



पत्रकार परिषदेत दिली माहिती


फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी परीक्षा १५३ विषयांचे परीक्षा घेण्यात आल्या, नऊ विभागीय मंडळातून एकूण १४ लाख ५८ हजार एवढ्या मुलांनी परीक्षा दिली. आज निकाल जाहीर होताच राज्याचा ८९.७९ टक्के इतका निकाल लागला. बारावीचा गेल्या वर्षीचा निकाल पहिला असता ९१.८८ टक्के निकाल लागला होता. यावर्षी सुद्धा मुलींनी बारावीच्या निकालात बाजी होती मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५४ टक्के इतकी होती. तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.५१ टक्के इतकी होती




यावर्षीच्या निकालाचा टक्का का घसरला?


निकाल घटण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यावरही कॉपीमुक्त अभियान हे चांगल्या प्रक्रारे राबवले गेले असून गेल्या वर्षी एकही कर्मचाऱ्यावरती कारवाई केली जात नव्हती तर यावेळी तस न करता १०० जणांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ९१.८८ निकाल होता तो यावर्षी २.० टक्क्याने घसरला आहे. सरकार तसेच बोर्डाकडून राबवल्या गेलेल्या या अभिनयामुळे टक्का जरी घसरला असला तरी कारवाई आणि कॉपी करण्याचे प्रमाण देखील घसरले आहे.



यावर्षी सुद्धा मुलींनीच मारली बाजी


यंदा टक्केवारी घसरली असली तरी, १२ विच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभंगोय मंडळातून ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ८६.८० टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहे.




२०२२ पासून घटणारा निकाल


२०२२ - ९४.२२ %


२०२३ - ९३. ७३ निकाल ०.४९% घसरला


२०२४ - ९३.३७ % निकाल ०.६६ % घसरला


२०२५ - ९१.८८% निकाल १.४९%


२०२६ - ८९.७९% निकाल २.०९%


 

 

 
Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य