LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! व्यावसायिक नंतर आता घरगुती सिलेंडरच्या किंमतीतही वाढ

मुंबई : गेल्या १५ वर्षांत घरगुती गॅस (LPG Gas) सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्या दुपटीहून अधिक झाल्या आहेत. आधीच महागाईचा भार सहन करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या महिन्यात ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर आता पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


१ मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात (LPG Gas Price Hike) तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली, ज्याचा थेट परिणाम हॉटेल आणि खानावळींच्या खर्चावर होण्याची शक्यता आहे. परिणामी, बाहेर जेवण महाग होण्याची शक्यता असून नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या खर्चात वाढ होऊ शकते.


सूत्रांच्या माहितीनुसार, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ४० ते ५० रुपयांची वाढ होऊ शकते. सध्या सिलेंडरचे दर आधीच १००० रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत आणखी दरवाढ झाल्यास सर्वसामान्यांचे मासिक बजेट विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



गॅस दरवाढीचा (LPG Gas Price Hike) सर्वाधिक फटका गृहिणींना बसण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांना पर्यायी उपायांचा विचार करावा लागू शकतो. काही ठिकाणी पारंपरिक चुलीचा वापर पुन्हा वाढेल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. याचा परिणाम देशातील इंधन दरांवर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरकारने कर कमी करून महागाईचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जागतिक परिस्थितीमुळे भविष्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही.



जरी पेट्रोलियम मंत्रालयाने तातडीने दरवाढ (LPG Gas Price Hike) होणार नसल्याचे संकेत दिले असले, तरी व्यावसायिक गॅसनंतर घरगुती गॅसही महागण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी