सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल, त्या मुलाने...; महिलेची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण समोर

उत्तर प्रदेश : तुम्हांला 'डिजिटल अरेस्ट' बद्दल माहित  असेल तर उत्तम. नसेल माहित तर माहित करून घ्या, कारण 'डिजिटल अरेस्ट'च्या धमक्यांमुळे एका महिलेला आमला जीव गमवावा लागला आहे. वारंवार येणाऱ्या धमक्यांना कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. बिजनौर जिल्ह्यातून हे सायबर गुन्हेगारीबाबत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.


कोतवाली शहर परिसरातील फरीदपूर भोगी गावात राहणाऱ्या २८ वर्षीय मोनिकाने २७-२८ एप्रिलच्या रात्री आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ज्यावेळी तिने हे पाऊल उचललं, तेव्हा तिची ८ वर्षांची मुलगी जिया आणि ११ वर्षांची मुलगी नंदिनी त्याच खोलीत झोपल्या होत्या. सकाळी मुलींना जाग आली तेव्हा आईला त्या अवस्थेत पाहून त्यांनी टाहो फोडला.


अंत्यसंस्कारासाठी मोनिकाला स्मशानभूमीत नेण्यात आले. अंत्यसंस्कार सुरू असताना तिच्या मोबाईलवर सतत व्हिडीओ कॉल येऊ येत होतेमृत महिलेचा पुतण्या संयोग याने वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून शेवटी कॉल उचलला. समोर पोलीस वर्दीत असलेला एक व्यक्ती स्वतःला क्राईम ब्रँचचा अधिकारी सांगत होता. त्याने मोनिकाशी बोलण्याचा आग्रह धरला आणि नकार दिल्यावर कारवाईची धमकी दिली. यामुळे कुटुंबीयांना सायबर फसवणुकीचा मोठा संशय आला.


घरी परतल्यानंतर मोनिकाच्या खोलीची झडती घेण्यात आली, तेव्हा एका डायरीमध्ये ठेवलेली चिठ्ठी सापडली. यामध्ये मोनिकाने एका अज्ञात तरुणाकडून सतत येणारे फोन, ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांचा उल्लेख केला होता. मोबाईल तपासला असता व्हॉट्सॲपवर पाच वेगवेगळ्या नंबरवरून आलेले कॉल्स, मेसेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सापडल्या. यातील काही जण अधिकारी बनून तिला घाबरवत होते, तर काही जण गंभीर आरोप करून तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकत होते.


सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण समोर


सुसाईड नोट मोनिकाने लिहिलं होतं की, "सॉरी, माय डिअर हसबंड, आय लव्ह यू. तुमच्याशी खूप बोलायचं आहे. गेल्या काही दिवसांपासून एक मुलगा मला त्रास देतोय, ब्लॅकमेल करतोय. प्लीज माझ्या मुलांची काळजी घ्या... पुन्हा जन्म मिळाला तर तुमचीच पत्नी म्हणून जन्माला येईल. आपली एनिव्हर्सरी येत आहे, सोबत नसल्याबद्दल सॉरी. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या."


चिठ्ठीच्या शेवटी तिने आपल्या मुलीचं नाव लिहीत म्हटलं, "सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल... त्या मुलाने तुझ्या मम्माला खूप त्रास दिला आहे." या प्रकरणी पती रणधीरच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सुसाईड नोट आणि मोबाईल डेटाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे कोणी धमकावत असल्यास घाबरून न जाता तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधणं अत्यंत आवश्यक आहे.


'डिजिटल अरेस्ट' ' म्हणजे काय ?


'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) हा सायबर गुन्हेगारीचा (Cyber Crime) एक प्रकार आहे, ज्यात भामटे पोलीस, सीबीआय (CBI) किंवा ईडी (ED) अधिकारी असल्याचे भासवून, व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना घाबरवून त्यांच्याच घरात किंवा एका खोलीत तासनतास 'नजरकैदेत' ठेवतात आणि पैसे उकळतात. हा प्रकार पूर्णपणे बनावट असून अशाप्रकारे फोनवरून अटक करता येत नाही.


अशा कॉलला घाबरू नका. कोणतीही एजन्सी व्हॉट्सॲप कॉलवर अटक करत नाही, कॉल आल्यास तो कॉल त्वरित कट करा आणि सरकारी अधिकाऱ्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करा.वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील किंवा ओटीपी शेअर करू नका .फसवणूक झाल्यास त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० (1930) वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.


Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु