एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, सोलापुरातील 'त्या' घरात मध्यरात्री 12 वाजता काय घडलं ?

Solapur Crime : सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी (Boramani) गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. आई, मुलगी आणि मुलाची एकाच वेळी हत्या झाल्याने संपूर्ण सोलापुरात खळबळ उडाली आहे. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Solapur Crime)


गाव साखर झोपेत असताना तिहेरी हत्याकांड (Boramani Murder Case) 


गायत्री सुधाकर मस्के वय 40, मुलगी प्रिया मस्के वय 18 आणि मुलगा शिवराज मस्के वय 16 अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. जेव्हा संपूर्ण गाव साखर झोपेत होते त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी मस्के यांच्या घरावर हल्ला चढवला. धारदार तलवारीने केलेल्या या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.


हसत्याखेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत (Boramani Murder Case) 


शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे स्वरूप इतके भीषण होते की, प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर शहारे आले. गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया या दोघींचे मृतदेह घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर मुलगा शिवराय याचा मृतदेह बैठकीच्या खोलीत आढळून आला. हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे मृतदेहांच्या स्थितीवरून दिसून येत होते . या घटनेत जीव गमावलेली प्रिया ही बारावीत शिक्षण घेत होती, तर शिवराय हा दहावीचा विद्यार्थी होता. दोघांनीही बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बोरामणी ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.


प्रॉपर्टीच्या वादातून हत्येचा संशय (Boramani Murder Case) 


घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या प्रॉपर्टीच्या (मालमत्तेच्या) वादातून झाल्याचे बोलले जात आहे. घराण्यातील किंवा परिचयातीलच व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण