नाशिक : जगातील सर्वात कठीण ट्रायथलॉनमध्ये डॉ. देविका पाटील यांचा इतिहास, केवळ दुसऱ्या भारतीयाने पूर्ण केली हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाईव्ह

नाशिक : हिमालयातील आव्हानात्मक परिस्थितीत पार पडणाऱ्या हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाईव्ह ट्रायथलॉनमध्ये डॉ. देविका पाटील यांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्या ही शर्यत पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि केवळ दुसऱ्या भारतीय ठरल्या. नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतरांगांच्या सान्निध्यात होणारी ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण एक्स्ट्रीम ट्रायथलॉनपैकी एक मानली जाते.


डॉ. पाटील या नाशिकमधील स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिकमध्ये मनोचिकित्सक म्हणून कार्यरत असून, व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत त्यांनी या स्पर्धेची तयारी केली. चार महिन्यांच्या कठोर सरावातून त्यांनी हे यश मिळवले. या ट्रायथलॉनमध्ये १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग (२,४०० मीटर चढ) आणि २१ किमी ट्रेल रन (१,७४० मीटर चढ) असे टप्पे सलग पूर्ण करावे लागतात. एकूण उंची सुमारे ४,१४० मीटर आहे.सरावासाठी त्यांनी अंबोली घाट आणि कसारा घाट येथे सायकलिंगसह पोहणे व ट्रेल रनिंगचा नियमित सराव केला.डॉ. पाटील यांचे पुढील लक्ष्य पूर्ण अंतराची हिमालयन एक्स्ट्री शर्यत पूर्ण करण्याचे आहे.


'ट्रायथलॉन' नेमके आहे तरी काय ?


ट्रायथलॉन (Triathlon) ही एक अत्यंत आव्हानात्मक सहनशीलता (endurance) मल्टिस्पोर्ट शर्यत आहे, ज्यामध्ये पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तीन क्रीडा प्रकारांचा सलग समावेश होतो. या ट्रायथलॉनमध्ये १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग (२,४०० मीटर चढ) आणि २१ किमी ट्रेल रन (१,७४० मीटर चढ) असे टप्पे सलग पूर्ण करावे लागतात. एकूण उंची सुमारे ४,१४० मीटर आहे.


 
Comments
Add Comment

Maratha Reservation : आरक्षण तिढा हे सगळं शरद पवारांचे पाप - विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. त्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका; जॉन्टी ऱ्होड्सचा बीसीसीआयला मोलाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या भविष्याबाबत आ

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने वेधले अनेकांचे लक्ष

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ आता केंद्रीय अन्वेषण

India A : न्यूझीलंड दौऱ्यावर भारत 'अ' संघ तीन चार-दिवसीय सामने खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघाचा २४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा महत्त्वपूर्ण दौरा, युवा क्रिकेटपटूंना

ICC Test Rankings : गिल-बुमराहच्या क्रमवारीत घसरण, पडिक्कलची मोठी झेप

दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची घसरण झाली

Krunal Pandya : भारताच्या टी२० संघातून वगळल्यानंतर कृणाल पांड्या निराश

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाच्या घोषणेपूर्वी, एका