Nashik MHADA Scam: 'म्हाडा' जमीन फसवणूक घोटाळ्यात नाशिकचा नायब तहसीलदार अटकेत, इतर अधिकारी-कर्मचारीदेखील संशयाच्या भोवऱ्यात

नाशिक : नाशिकमधील सध्या विविध प्रकरणे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरण , टीसीएस धर्मांतर प्रकरण आणि त्यासोबतच आणखी चर्चेत असलेले प्रकरण म्हणजे म्हाडा जमीन घोटाळा. याच म्हाडा जमीन फसवणूक प्रकरणात नाशिकच्या नायब तहसीलदारास अटक करण्यात आली आहे. संशयित नायब तहसीलदार नितीन पाटील याला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली .


नाशिकमधील म्हाडाच्या जमिनींवरील आरक्षणात झालेल्या बनावटगिरीबाबत नाशिक पोलीस आयुक्तालयाचे विशेष तपास पथक (एसआयटी) गेल्या दोन महिन्यांपासून तपास करीत आहे. सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने शनिवारी (दि. २) रात्री उशिरा नायब तहसीलदार नितीन पाटील याला ताब्यात घेतले. रविवारी (दि. ३) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पाटील याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय.


नेमकं प्रकरण काय ?


चार हजार चौरसमीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या जमिनीवर गृहप्रकल्प विकसित करताना २० टक्के जागा म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. मात्र, नाशिकमधील अनेक विकासक आणि जमीन मालकांनी ही तरतूद टाळण्यासाठी जमिनीचे तुकडे करून ते चार हजार चौरसमीटरपेक्षा कमी असल्याचे भासवले. दरम्यान, नायब तहसीलदार नितीन पाटील हा सन २०२२ पासून नाशिकमध्ये नियुक्त आहे. त्याने तलाठी व इतरांवर दबाव आणत संशयित बिल्डर, विकासकांकडे असलेले जमिनीचे बनावट नकाशे मंजूर करण्यास भाग पाडले. त्याने ३१ प्रकरणांना या स्वरूपात मंजुरी दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या कार्यालयातील इतर कागदपत्रांसह सर्व प्रकरणांची पडताळणी पोलिस करीत आहेत.


महत्त्वाचे म्हणजे या गुन्ह्यात अटक झालेला पाटील हा पहिला प्रशासकीय अधिकारी आहे. यामुळे तलाठी, तहसीलदार, भूमी अभिलेख या कार्यालयांमधील इतर अधिकारी-कर्मचारीदेखील संशयाच्या भोवऱ्यात असून, पोलिस त्या दिशेने देखील तपास करत आहे. या गुन्ह्यात गंगापूर शिवारातील सर्व्हे क्रमांक ७०/१/१ ते ५ या जमिनीच्या प्रकरणात १६ मार्च रोजी दिनेश कन्हैय्यालाल उर्फ सोनू मनवानीला अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीनंतर सशर्त जामिनावर मनवानी काही दिवसांपूर्वीच कारागृहाबाहेर आला, तर २३ एप्रिल रोजी म्हसरूळ शिवारातील सर्व्हे क्रमांक २८७/१ ते ३ या जमिनीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक भगवानदास करमचंदानी याला अटक झाली होती. त्यानंतर आता ३ मे रोजी पाटील याला अटक झाली असून, अजूनही बरेच संशयित अटकपूर्व जामिनासाठी धावधाव करीत आहेत.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या