Unorganized Workers : असंघटित कामगारांसाठीची ३९ आभासी मंडळे रद्द

मुंबई : असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी ३९ आभासी मंडळे (व्हर्च्युअल बोर्ड्स) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत शासन जारी केला. केंद्र सरकारच्या नवीन 'सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०' च्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रशासनातील दुप्पट काम टळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.



आधीच्या ६ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार, असंघटित कामगारांची नोंदणी, ओळख आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांचे ३९ क्षेत्रांमध्ये आणि ३४० प्रकारच्या व्यवसायांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. त्यानुसार, असंघटित कामगारांसाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र ३९ आभासी मंडळे स्थापन करण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी 'सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०' अधिसूचित केली आहे. या संहितेच्या कलम ६ (१) मधील तरतुदीनुसार, राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.



निर्णय का घेतला?


- नवीन संहितेच्या कलम १०९ (१) आणि (२) नुसार केंद्र व राज्य शासनामार्फत असंघटित कामगार, गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म बेस्ड वर्कर्स यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने जीवन आणि अपंगत्व विमा संरक्षण, आरोग्य व मातृत्व लाभ, वृद्धापकाळ संरक्षण, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), मुलांसाठी शैक्षणिक योजना, कौशल्य उन्नयन आणि गृहनिर्माण यांसारख्या अनेक लाभांचा समावेश आहे.



- या नवीन सामाजिक सुरक्षा संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पूर्वीच्या रचनेतील तरतुदी, वर्गीकरणाची पद्धत व आभासी मंडळांची गरज तपासून पाहता, ६ जुलै २०२३ चा शासन निर्णय आणि त्याअंतर्गत तयार केलेली ३९ आभासी मंडळे आता रद्द करण्यात आली आहेत. तसेच, या आधीच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वे व अंमलबजावणी कार्यपद्धती यापुढे लागू राहणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य