Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला ९ मे पर्यंत पोलीस कोठडी, आता शिर्डी पोलीस करणार चौकशी

शिर्डी : भोंदू अशोक खरातला ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश राहता न्यायालयाने दिले आहेत. आता शिर्डी पोलीस खरातची चौकशी करणार आहेत. खरात आणि त्याच्या पत्नीवर एका शेतकऱ्याची फसवणूक तसेच बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात आणि त्याच्या पत्नीने एका शेतकऱ्याला विविध प्रलोभने दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची उकळपट्टी केली. 'भोंदूगिरी'च्या माध्यमातून खरात आधी विश्वास संपादन करायचा आणि नंतर आर्थिक गंडा घालायचा, यासोबतच कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर सावकारीचे जाळेही त्यांनी विणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिर्डी पोलिसांनी चक्रे वेगाने फिरवत आरोपी खरातला नाशिकमधून अटक केली. अटकेनंतर त्याची राहता ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्याला राहता न्यायालयात हजर करून पोलिसांनी अधिक चौकशीसाठी कोठडीची मागणी केली. राहता न्यायालयाने अशोक खरातला ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार आहे. पोलीस कल्पना खरातला शोधत आहेत.


खरातचा उजवा हात मानला जाणारा अरविंद बावके याला आधीच अटक झाली आहे. अशोक खरात विरोधात शिर्डीतील गुन्ह्यासह एकूण दहा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने दिल्लीतील अपोलो

मध्य रेल्वेचा कसारा येथे मेगाब्लॉक; 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेवर आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या