Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; लोगोचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

बदलापूरला १३ ते ८ मे दरम्यान होणार स्पर्धा


मुंबई : बदलापूर येथे १३ ते १७ मे याकाळात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होत असून या स्पर्धेचा आढावा आज उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. यावेळी स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.



सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस आमदार किसन कथोरे, कुळगांव- बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, क्रीडा विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, महाराष्ट्र व्हिलीबॉल असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.



१८ व २१ वर्षीय मुला मुलींसाठी ही राज्यस्तरीय स्पर्धा असून क्रीडा विभाग आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठीच्या आयोजन समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यावेळी बैठकीत खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था, मैदान तयारी, आरोग्य व्यवस्था आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. खेळाडूंच्या निवासाची चांगली व्यवस्था करा त्यासाठी लागणार २५ लाखांचा निधी सिडकोच्या माध्यमातून देण्याचे निर्देश उपमुखमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, यावेळी ठाणे विभागीय क्रिडा संकुलाबाबत देखील आढावा घेण्यात आला.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत