Jalgaon Crime : अश्लील फोटो अन व्हिडिओ काढून उच्चशिक्षित तरुणीला ब्लॅकमेल केले, ८ लाख रोख अन् ९० ग्रॅम सोनं…

जळगाव : चाळीसगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रीच्या नावाखाली एका तरुणाने उच्चशिक्षित तरुणीशी जवळीक साधत तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून तब्बल ८ लाख १२ हजार रुपये आणि ९० ग्रॅम सोने उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाणे (Chalisgaon City Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Jalgaon Crime)


नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एक २४ वर्षीय तरुणी एमडीएसचे शिक्षण घेत आहे. संशयित यश महेंद्र जैन याच्याशी २०२२ मध्ये तिची ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काही काळानंतर आरोपीने तरुणीला भेटण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने व्हिडिओ कॉलदरम्यान काढलेले तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.(Jalgaon Crime)


धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणीकडून आरोपीने वेळोवेळी मोठी रक्कम उकळली. इतकेच नव्हे तर तिच्याकडून ८ लाख १२ हजार रुपये रोख आणि ९० ग्रॅम सोनेही घेतल्याचे समोर आले आहे. आरोपीने तरुणीला मारहाण केल्याचाही आरोप आहे.


पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाणे (Chalisgaon City Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपीचे कॉलेज परिसरात आईस्क्रीम पार्लर असल्याची माहिती समोर आली असून या प्रकारात इतर मुलींचीही फसवणूक झाली आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


तर दुसरीकडे जळगाव शहरातील एटीएम केंद्रांवर नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या खात्यातून पैसे लांबवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून २ लाख ३१ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील त्याचा दुसरा साथीदार मात्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण