Malshej Accident News : माळशेज घाटात भीषण अपघात; एसटी बस आणि स्कॉर्पिओच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू

माळशेज : माळशेज घाट परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील वैशाखरे वळणावर एसटी बस आणि स्कॉर्पिओ कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून. तसेच, एका लहान मुलासह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.



प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वैशाखरे वळणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना त्वरित टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच टोकावडे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.



आज सकाळी कल्याणहून अहिल्यानगरकडे जाणारी एसटी बस वैशाखरे येथील वळणावर पोहोचली होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारसोबत बसची भीषण धडक झाली. ही धडक इतकी तीव्र होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात स्कॉर्पिओमधील एका पुरुषाचा आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


या दुर्घटनेत एका लहान मुलासह एकूण पाच जण जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना वाहनांमधून बाहेर काढले. सर्व जखमींना त्वरित उपचारासाठी टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून वाहतूक पूर्ववत केली. सध्या जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.