Pune Crime : अटकेची भीती अन् ७ लाख रुपयांचा चुना; पुण्यातील पोलिसांचे प्रताप

पुणे : भीती दाखवत एखाद्याकडून खंडणी वसुली केली जाते आणि पोलीस आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकतात, पण जर पोलीसच खंडणी वसुली करणारे निघाले तर? पुण्यातुन असाच एक प्रकार समोर आला असून पोलीस चोर झाले आहेत.



नेमकं घडलं काय?


पुण्यातील एका प्राचार्यांना या पोलिसांनी अटकेची भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल ७ लाख रुपये उकळले होते. प्राचार्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी मार्शल, सोनाली हिंगे, आणि कर्मचारी सुदाम तायडे या तिघांवर आरोप केला आहे. या तिघांनी मिळून संबंधित प्राचार्यांना गुन्ह्यात अडकवण्याची आणि अटक करण्याची भीती दाखवली आणि त्यांच्याकडून ७ लाख रुपये बळावले.




पोलिसांनाच झाली अटक


आता या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनीच कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे हे पोलीस असून त्यांना तातडीने बडतर्फ करण्यात आले आहे.




पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन


पुण्यात पोलिसांना लाच खाताना रंगेहाथ पकडले असून लाचखोर प्रकरणात दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. वैशाली तोटेवारांना १ मे रोजी पोलीस निरीक्षक, लोहमार्ग, मुंबई या पदावरून रुजू होण्यासाठी पदोन्नतीवर कार्यमुक्त करण्यात आलं होत. तोटेवार यांनी खासगी व्यक्तीच्या माध्यमातून एका हॉटेलच्या परिसरात २७ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. तसेच उपनिरीक्षक ८० हजारांची लाच स्वीकारताना पकडले गेले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी