Housekeeping in major BMC hospitals : बीएमसीच्या प्रमुख रुग्णालयांतील हाऊसकीपिंग टेंडरमध्ये ४५ कोटी रुपयांचा घोटाळा; प्रस्ताव उद्या स्थायी समितीत मांडला जाणार

भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र; टेंडर रद्द करून सखोल चौकशीची मागणी


Aura FMS ने ग्रॅच्युइटी, सुरक्षा साहित्य, स्वच्छता साहित्य यासाठी ‘शून्य’ दर कोट केला — आमदार मिहीर कोटेचा


Aura FMS ही फक्त फ्रंट कंपनी; प्रत्यक्ष काम वादग्रस्त कंत्राटदार M/s Highway Constructions करणार, आरोग्य अधिकारी यांचे संगनमत करून घोटाळा — आमदार मिहीर कोटेचा


KEM रुग्णालयात स्थायी समितीच्या मंजुरीपूर्वीच कामगारांची नियुक्ती — आमदार मिहीर कोटेचा


मुंबई: मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रमुख महापालिका रुग्णालयांतील हाऊसकीपिंग कंत्राटांसाठी काढलेल्या टेंडरमध्ये ४५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ते रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बीएमसीच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली असून, निविदा प्रक्रियेत संगनमत करून फेरफार झाल्याचा आरोप केला आहे.



बुधवारी होणाऱ्या बैठकीत स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.


बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलेल्या पत्रात कोटेचा यांनी नमूद केले की, हे टेंडर अंदाजित खर्चापेक्षा २०% पेक्षा कमी दराने कोट करण्यात आले आहे. सर्वात कमी बोली लावणाऱ्या M/s Aura FMS Pvt Ltd ने कामगार व पर्यवेक्षकांसाठी ग्रॅच्युइटी, सेवा शुल्क आणि सुरक्षा साहित्य यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये “शून्य” दर दाखवला आहे. मात्र निविदा फॉर्ममध्ये किमान रक्कम नमूद करणे बंधनकारक होते.


कोटेचा यांनी पुढे नमूद केले की, Annexure ‘B’ मध्ये Aura FMS ने दैनंदिन स्वच्छता साहित्य जसे की जंतुनाशके, डिटर्जंट, साबण, ब्रश, झाडू इत्यादींसाठीही शून्य खर्च दाखवला आहे. सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० च्या कलम ५३ नुसार, एका वर्षानंतर ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक आहे. Aura FMS ही जणू देशातील सर्वात मोठी समाजसेवक संस्था आहे. कारण २६६ कोटी रुपयांच्या कंत्राटात त्यांना एक रुपयाही नफा मिळणार नाही, असा उपरोधिक टोलाही कोटेचा यांनी लगावला.



आमदार कोटेचा यांनी असाही दावा केला की, कंपनीने कामगारांच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च शून्य दाखवून कामगारांच्या आरोग्याशी तडजोड केली असून कामगार कायद्यांचे उल्लंघन केले आहे. Aura FMS कडे जादूची कांडी असावी. ते ४१ लाख चौरस फूट क्षेत्र, ज्यामध्ये ८०० बाथरूम्स आहेत, कोणत्याही स्वच्छता साहित्याशिवाय आणि खर्चाशिवाय सांभाळणार आहेत, असे त्यांनी म्हटले.


कोटेचा यांनी दावा केला की, Aura FMS ही केवळ फ्रंट कंपनी असून प्रत्यक्ष काम वादग्रस्त कंत्राटदार M/s Highway Constructions कडून करून घेतले जाणार आहे. त्यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर “साटेलोटे” असल्याचा आरोप केला. Aura FMS Pvt Ltd यांनाच कंत्राट मिळेल अशा पद्धतीने संपूर्ण निविदा प्रक्रियेत फेरफार केली केल्याचाही दावा त्यांनी केला आहे.


तसेच, कंत्राटदाराने स्थायी समितीची मंजुरी मिळण्यापूर्वीच KEM रुग्णालयात शेकडो कामगार तैनात केल्याचा आरोपही त्यांनी केला. हे “सत्तेचा दुरुपयोग आणि अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे आलेला अहंकार” असल्याचे कोटेचा यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन