Teacher Recruitment : राज्यात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश; 'पवित्र' पोर्टलवरून होणार भरती


मुंबई : शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकणार असून, शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग खुला झाला आहे.



या भरती प्रक्रियेत शासनाने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार, केवळ सध्या रिक्त असलेल्या जागाच नव्हे, तर मे २०२६ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य रिक्त पदांचाही यात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असून अधिकाधिक पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.


भरती प्रक्रियेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले असून, १ ते ३१ मे या कालावधीत सर्व शाळा व्यवस्थापनांनी त्यांच्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर जून महिन्यात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार आणि गुणांच्या आधारे शाळांचे पसंतीक्रम (ऑप्शन्स) निवडण्याची संधी मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याने प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक वाढेल.




कोण पात्र?


गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ला (TAIT) राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या परीक्षेसाठी सुमारे २ लाख २८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी आपली स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली असून, या पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



मुलाखतींविना होणार निवड


भरती प्रक्रियेत वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया होणार असल्याने मानवी हस्तक्षेप पूर्णपणे कमी होणार आहे. तसेच, सर्व शाळांना त्यांच्या आरक्षणानुसार बिंदुनामावली (रोस्टर) तपासूनच जाहिरात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची पदे पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय भरली जाणार आहेत. मात्र, खासगी संस्थांना प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने