Crude Oil Prices : इराण-अमेरिका तणाव थांबण्याच्या संकेतांमुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ईरान-अमेरिका संघर्षात थांबण्याचे संकेत मिळू लागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ समाप्त करण्याचा आणि ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ या नौदल मोहिमेला तात्पुरता स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलला आणि बाजारात विक्रीचा दबाव वाढला. याचा परिणाम म्हणून ब्रेंट क्रूडचे दर तब्बल ११ टक्क्यांनी घसरून ९७.०८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूडही १३.३१ टक्क्यांनी घसरून ८८.६६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले.



अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर ६६ दिवसांनी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ यशस्वीरित्या पूर्ण झाले असून त्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर युद्ध भडकण्याची शक्यता कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या माध्यमातून होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांना मार्ग काढून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना स्थगिती देण्याची घोषणा केली, मात्र नौदलाची नाकेबंदी सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


या घडामोडींमुळे बाजारात शांततेच्या अपेक्षा निर्माण झाल्या आणि कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाईचा कल दिसू लागला. ब्रेंट क्रूडने दिवसाच्या सुरुवातीला २.१२ डॉलरने घसरत १०७.७५ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार सुरू केला होता. काही वेळातच दर वाढून १०८.९१ डॉलरपर्यंत गेले, परंतु ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ स्थगित करण्याच्या घोषणेनंतर पुन्हा मोठी घसरण झाली आणि दर ९७ डॉलरच्या खाली आले. नंतर किंचित सुधारणा होऊन भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत ब्रेंट क्रूड १०२.६० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते.



डब्ल्यूटीआय क्रूडच्या बाबतीतही अशीच स्थिती दिसून आली. सुरुवातीला २.४० डॉलरने घसरत ९९.८७ डॉलरवर व्यवहार सुरू झाले, त्यानंतर दर १०२.७० डॉलरपर्यंत गेले. मात्र नंतरच्या घडामोडींमुळे दर कोसळून ८८.६६ डॉलरवर आले. त्यानंतर काहीशी सुधारणा होऊन सायंकाळी सहा वाजता ते ९२.६३ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते.


तज्ज्ञांच्या मते, जरी पश्चिम आशियात पूर्णतः शांतता प्रस्थापित झाली आणि होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली झाली, तरी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता कमी आहे. टीएनव्ही फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारकेश्वर नाथ वैष्णव यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत दर ८० ते ८५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊ शकतात, परंतु युद्धापूर्वीच्या पातळीवर म्हणजेच ६० ते ७० डॉलरच्या पातळीवर पोहोचण्यासाठी वेळ लागेल.


याचे प्रमुख कारण म्हणजे युद्धादरम्यान ऑयल इन्फ्रास्ट्रक्चरचे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान. इस्रायलने इराणच्या तेलसंबंधित सुविधांवर जोरदार हल्ले केले, तर प्रत्युत्तरादाखल इराणने खाडीतील अमेरिकेच्या सहयोगी देशांच्या तेलसुविधांनाही लक्ष्य केले. त्यामुळे या प्रदेशातील तेलपुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. हे नुकसान भरून निघेपर्यंत आणि उत्पादन क्षमता पूर्ववत होईपर्यंत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने