Minister Nitesh Rane : जयगड (रत्नागिरी) बंदराच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या...

कोकणातील हापूस, काजू, मत्स्य निर्यातीसाठी सुविधा सक्षम करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश


कोकणातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठेची दारे खुली होण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार


मुंबई, दि. ६ : कोकणातील काजू, हापूस आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे आहे. येथून कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज केल्या.


मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या प्रादेशिक संचालक प्रीती चौधरी, जेएसडब्ल्यू पोर्टचे दिलीप शेट्टी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह बंदरे, परिवहन,महाराष्ट्र सागरी मंडळासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, कोकणातील शेतकऱ्यास जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे असून या बंदरातून निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखत कामे गतीने व दर्जेदार करावीत. कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, शीतसाखळी व्यवस्था, तपासणी प्रक्रिया, वाहतूक साखळी तसेच बंदरांमधील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत त्यांनी सुचित केले.



मंत्री नितेश राणे म्हणाले,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा व काजू उत्पादन होते, तर कोकणातील हापूस आंब्याला जागतिक स्तरावर विशेष मागणी आहे. मत्स्यव्यवसायही कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे या सर्व उत्पादनांना थेट परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी निर्यात प्रकल्पाचे काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.


शेतकरी आणि मत्स्य व्यवसायिकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळण्यासाठी निर्यात व्यवस्था सक्षम होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून,मंत्री राणे यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्यक्ष निर्यात प्रक्रिया सुरू होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.



काजू उत्पादक, हापूस आंबा उत्पादक आणि मत्स्य व्यवसायिकांमध्ये या प्रकल्पाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री श्री राणे यांनी केल्या. कोकणातील उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळेल आणि संपूर्ण कोकणाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कोकणाच्या भविष्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून पुढील काळात तो राज्याच्या निर्यातवाढीसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे आतापासूनच नियोजनबद्ध आणि वेगवान पद्धतीने काम करण्याचे निर्देश मंत्री श्री. नितेश राणे यांनी यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या