BMC : मुंबई महापालिका आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची घेतली काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून कर्मचाऱ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच, वाढत्या उष्णतेच्या प्रभाव लक्षात घेता, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (ऑन फिल्ड) कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी चौक्यांवर निर्जलीकरण भुकटी (ओआरएस पावडर) आणि पिण्याच्या पाण्याची योग्यप्रकारे व्यवस्था करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.


प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही भिडे यांनी केले आहे.


मुंबईतील वाढत्या उष्णतेच्या अनुषंगाने, महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. उष्माघाताच्या रुग्णांसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उष्माघातापासून बचावासाठी करावयाच्या उपायोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (ऑन फिल्ड) कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.


महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सांगितले की, विविध विपरित परिस्थितींमध्ये देखील महानगरपालिकेचे कर्मचारी कर्तव्य पार पाडत असतात. मुंबईत स्वच्छता अबाधित राखण्यासाठी सुमारे ४० हजार स्वच्छता कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. मात्र, सध्या वाढत्या तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कार्यस्थळी (ऑन फिल्ड) कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व चौक्यांमध्ये तात्काळ पुरेशा प्रमाणात निर्जलीकरण भुकटी (ओआरएस पावडर) आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच, याबाबत नियमित देखरेख ठेवावी, असे निर्देश भिडे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने