National Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जाहीर

मुंबई : राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत (एनपीएस) कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ लागू केली आहे. वित्त विभागाने बुधवारी यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय जारी केला असून, या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आपले पर्याय संबंधित कार्यालय किंवा विभाग प्रमुखांकडे सादर करणे आवश्यक आहे.



सुधारित योजनेनुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केली आहे, त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन आणि त्यावर लागू असणारा महागाई भत्ता (डीए) मिळेल. २० वर्षांपेक्षा कमी व १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन देय असेल. १० वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्तीवेतन ७ हजार ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. तथापि, १० वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना हे किमान निवृत्तीवेतन लागू असणार नाही.




राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियम


ज्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत जमा झालेल्या संचित निधीतून रक्कम काढली असेल, त्यांना ती रक्कम १० टक्के व्याजासह जमा करणे बंधनकारक असेल. अन्यथा त्यांच्या निवृत्तीवेतनात त्या प्रमाणात कपात करण्यात येईल. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांना या सुधारित योजनेचे लाभ मिळणार नसून, ते केवळ मूळ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या लाभासाठी पात्र असतील.



कुणकुणाचा समावेश?


या सुधारित योजनेचा लाभ केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, त्यात जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने