PM Vishwakarma Yojana : ऐकलंत का ? मोदी सरकार ३ लाख रुपये देतंय, पण कशासाठी ? काय आहे सरकारची योजना ? जाणून घ्या

PM Vishwakarma Yojana: सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना (PM Vishwakarma Yojana). प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरु केलीय. दरम्यान, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.


गेल्या काही वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक पारंपरिक व्यवसाय मागे पडत होते. सुतारकाम, लोहारकाम, मातीशिल्प, शिवणकाम यांसारख्या व्यवसायांना योग्य बाजारपेठ आणि आर्थिक मदत मिळत नव्हती. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही कारागिरांसाठी ‘लाइफलाइन’ ठरत आहे. या योजनेमुळे कारागिरांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. (Prime Minister Vishwakarma Skill Development Scheme)



३ लाखांपर्यंत कर्ज सुविधा


या योजनेची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे. पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपये देण्यात येते. एकूण ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज फक्त आणि फक्त ५% व्याजदराने उपलब्ध असल्याने लघु उद्योगांना मोठा आर्थिक हातभार मिळतो. या कर्जाच्या मदतीने अनेक कारागिरांनी आपले व्यवसाय विस्तारले आहेत. ज्यामुळे व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत मिळाळी आहे. (Prime Minister Vishwakarma Skill Development Scheme)


या योजनेअंतर्गत कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची कौशल्ये अधिक विकसित केली जातात. प्रशिक्षण काळात दररोज ५०० रुपये मानधन दिले जाते. आधुनिक साधने खरेदीसाठी १५,००० रुपयांचे अनुदान दिले जाते . यामुळे पारंपरिक कामकाज अधिक जलद, अचूक आणि स्पर्धात्मक बनत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारागिरांना अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. (PM Vishwakarma Yojana)



१८ प्रकारच्या कारागिरांना योजनेचा फायदा


या योजनेत विविध पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सुतार, लोहार, सोनार, कुंभार, नाभिक, मोची, टेलर, गवंडी, माती शिल्पकार, दगडकाम करणारे, जाळी तयार करणारे अशा एकूण १८ प्रकारच्या कारागिरांना लाभ मिळतो. यामुळे विविध क्षेत्रातील कौशल्य असलेल्या कामगारांना या योजनेचा फायदा घेता येतो.

तुम्हांलाही योजनेचा लाभ घ्यायचा आहे ?


तुम्हांलाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे असेल तुम्ही अर्ज करू शकतात. जसे की, महा-सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टल. अर्जानंतर कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान मंजूर केले जाते.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''