Shimla Court : शिमला येथे न्यायालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी

“दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा पोस्टरमधून इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क


शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तीन शाळांना धमक्या मिळाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोहडू भागातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय आणि न्यायालय उडवण्याची धमकी देणारे पोस्टर बुधवारी सकाळी भराड़ी रस्त्यावर आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर रोहडूमध्येही मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने सुरक्षेचे कडक उपाय सुरू केले आहेत.


भराडी रस्त्यावर लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये उर्दू शब्दांचा वापर करून हिंदीत धमकी लिहिण्यात आली होती. या पोस्टरमध्ये “तक़रीर, इत्तलाह-ए-मुबारक का वक्त आ गया है. आतिशबाजी से जश्न-ए-इबारत तामिल होगी. इंशाअल्लाह बुधवार को रोहड़ू की अदालत और उपविभागीय अधिकारी कार्यालय में धमाके की गूंज दिल्ली तक सुनाई देगी” असा मजकूर लिहिला होता. पोस्टरच्या शेवटी “अल्लाह का एक नेक मुजाहिर” असेही नमूद करण्यात आले होते. या मजकुरामुळे ही धमकी केवळ खोडसाळपणाची नसून नियोजित कटाचा भाग असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.



धमकी मिळताच पोलिस प्रशासन तात्काळ सतर्क झाले. रोहडू येथील न्यायालय परिसर आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय तत्काळ रिकामे करण्यात आले. परिसरातील सर्व वाहने हटवण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्फोटक शोध पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.


शिमला पोलिसांनी भराड़ी परिसरातून मिळालेले पोस्टर जप्त करून तपास सुरू केला आहे. तसेच या प्रकरणात कोणत्या व्यक्ती किंवा संघटनेचा हात आहे याचा शोध घेण्यासाठी सायबर पथक आणि गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. पोस्टर कोणी लिहले, कोठून लावले आणि त्यामागील हेतू काय आहे याचा तपास सध्या वेगाने सुरू आहे.


या संदर्भात शिमला जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळताच तातडीने सर्व प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत न्यायालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय रिकामे करण्यात आले आहे. परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्फोटक शोध पथकाला बोलावण्यात आले आहे. आतापर्यंतच्या तपासात कोणतीही धोकादायक वस्तू आढळलेली नाही, मात्र तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही ढिलाई केली जाणार नाही.



या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपास यंत्रणा प्रत्येक कोनातून या घटनेचा शोध घेत आहेत. धमकी देणाऱ्यांचा माग काढण्यासाठी तांत्रिक आणि गुप्त माहितीचा वापर करण्यात येत आहे.


दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी