SIR' formula in Maharashtra : पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रात ‘एसआयआर’ फॉर्म्युला

२०२९च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; सर्व लहान-थोर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार


मुंबई : पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे मानले जाते. आता हाच कित्ता महाराष्ट्रात गिरवत मराठी मुलूखावर घट्ट पकड निर्माण करण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी बुधवारी दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.



राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयकुमार गोरे, नितेश राणे, अतुल सावे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



भाजपने 'एसआयआर' मोहिमेच्या तयारीसाठी एक विस्तृत कार्यक्रम आखला आहे. सुरुवातीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर, टप्प्याटप्प्याने पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना विभागीय पातळीवर प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.



२०२९मध्ये स्वबळाची चर्चा


भाजपच्या या विशेष मोहिमेमुळे आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना, "भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. आपण स्वबळावर चालणारा पक्ष आहोत," असे सूचक विधान केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी रणनीती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन