BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत मुंबई शहर अंतर्गत २४ हजार २८५ आणि उपनगरात ४६ हजार ३७२ नागरिकांनी जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणनेच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. मुंबईत जनगणना - २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत  १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना पार पडणार आहे. यानंतर घरयादी व घरगणनेची सुरूवात  १६ मे ते  १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे.


जनगणना - २०२७ अंतर्गत स्व- गणनेसंदर्भात  महानगरपालिका मुख्यालयात  गुरुवारी ७ मे २०२६ रोजी आढावा बैठक पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सर्व परिमंडळांचे उपायुक्त आणि सहायक आयुक्त, सहसंचालक (जनगणना)  संतोष पायस, कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. संतोष गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. जनगणना २०२७ च्या कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी संख्या आणि प्रशिक्षणाच्या कामकाजाचा आढावा बैठकीत घेण्यात आला.


मुंबईत 'जनगणना - २०२७' अंतर्गत स्व-गणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी, त्यादृष्टीने आवश्यक जनजागृती करावी. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्व-गणना प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून काम करावे. तसेच,  मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, बस स्थानक, मेट्रो, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी स्व-गणेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त  आश्विनी भिडे यांनी केले. जनगणना - २०२७ अंतर्गत स्वगणनेच्या पहिल्या टप्प्यातील उत्तम कामगिरीच्या आधारावर दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी चांगली मदत मिळू शकते. म्हणूनच पहिल्या टप्प्यात अधिकाधिक नागरिकांना या प्रक्रियेचा भाग करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.


जनगणना- २०२७ अंतर्गत स्व-गणनेची माहिती डिजिटल स्वरूपात भरण्यासाठी स्व-गणनेसंदर्भातील संकेतस्थळाची लिंक अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी गरज आहे. ही लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ठिकाणीही जनजागृतीसाठी अधिकाधिक प्राधान्य देण्यात यावे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आरोग्य सेविकांच्या मदतीने स्वगणनेची लिंक अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही आयुक्त  आश्विनी भिडे यांनी दिल्या.  उपायुक्त तसेच प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त यांनी अधिकाधिक कर्मचारी स्वगणनेच्या प्रक्रियेत सहभागी होतील, यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'शिप ब्रेकिंग पॉलिसी' अंतर्गत २०३० पर्यंत ७० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य; मंत्री नितेश राणे यांची माहिती

जहाज बांधणी, जहाज तोडणीसाठी स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य मुंबई : भारताच्या जहाज बांधणी आणि जहाज

Ashwini Bhide : आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात आता खरे मुखवटे समोर येतील!

- मंत्री नितेश राणे; भगिनीला न्याय मिळाला याचा आम्हाला आनंदच मुंबई : दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

Ambernath railway station video : अंबरनाथ स्थानकात थरार! लोकल ट्रेन येण्यापूर्वी प्रवाशांनी दिव्यांगाला रुळावरून ओढले आणि पुढे...

अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सुरक्षेच्या चिंतेत भर घालणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना

Nalasopara Name Change : नालासोपाराचं नाव बदलण्याची मागणी; ‘शूरपरक’ नावासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रस्ताव

मुंबई : नालासोपाराचे प्राचीन नाव ‘शूरपरक’ पुन्हा बहाल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. वसई-विरार शहर

EatClub Brands FSSAI License Suspended : EatClub Brandsच्या किचनमध्ये नेमकं काय आढळलं? FDAच्या तपासणीत धक्कादायक त्रुटी; FSSAI परवाना निलंबित

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील EatClub Brands Private Limited या खाद्य आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA)