Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात बेकायदेशीर व्हीआयपी दर्शनाचा बाजार, नोकरी नाही व्यवसाय नाही तरी 'त्याच्या' बँक खात्यात लाखों रुपये

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांची फसवणूक करून कशाप्रकारे लूट होते याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर नाशिकरांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. (Illegal VIP visit) दरम्यान या प्रकरणात महत्त्वाची अपडेट सामोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य एजंट असलेला वसंत मुतर्डक याच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्याच्या खात्यातून लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे वसंत बेरोजगार आहे. तो ना कुठली नोकरी करतो ना व्यवसाय. मग लाखो रुपये त्याच्या बँक खात्यात आले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Nashik Crime News )



नेमके प्रकरण काय ?


त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) येथे दर्शनासाठी रांगेत उभे असताना, फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना संशयित गोटीराम पेहरे याने गाठले. दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी ४-५ तास लागतील असे सांगून, तीन हजार रुपयांत दर्शवून घडवून देतो असे सांगितले.(Illegal VIP visit) धकाकदायक म्हणजे मंदिर देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत पावती त्यांना आली नाही. अशाप्रकारे इतरही भाविकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आणि या टोळीने भाविकांच्या श्रद्धेचा कसा बाजार मांडला हे सत्य देखील समोर आले आहे. (Nashik Crime News )


दरम्यान, संशयित एजंट वसंत मुतर्डक हा कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नाही. मात्र, त्याच्या गेल्या एका वर्षाच्या बँक स्टेटमेंटची पाहणी केली असता, त्यात ऑनलाइन आणि रोख स्वरूपात तब्बल २५ लाख २७हजार ५२० रुपयांची रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. हा पैसा कुठून आला आणि या रॅकेटचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आता एसआयटी (SIT) करत आहेत. मुतर्डक विरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे. गुजरात राज्यातील सुरत येथील भाविक चिराग दालिया यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद असून त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल आहे. (Nashik Crime News )



वसंत मुतर्डकला सात दिवसांची पोलीस कोठडी


अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. पोलिसांनी सादर केलेला तपास अहवाल आणि बँक खात्यातील संशयास्पद व्यवहार पाहता, न्यायालयाने संशयित वसंत मुतर्डक याला सात दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे, तर इतर संशयितांना कोठडी मध्ये पाठवण्यात आले.

Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख