RCB VS LSG : आयपीएलमध्ये आज आरसीबी विरुद्ध लखनऊची लढत, फिल सॉल्ट बाहेर , कशी असेल खेळपट्टी ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ५० वा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यात होणार आहे. यंदाच्या हंगामात आरसीबीने चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीने आता पर्यंत ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत ,तर तीन सामन्यांत त्यांचा पराभाव झाला आहे. आरसीबी १२ गुणांसह गुणवतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर लखनऊसाठी २०२६ चा हंगामा फारसा चांगला गेला नाही. लखनऊने ९ पैकी ७ सामने गमवले आहेत. यामुळे ते गुणवतालिकेत चार गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यांत जर लखनऊचा पराभव झाला तर आयपीएल २०२६ चे त्यांचे आव्हान संपुष्टान येईल,आणि प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडणारी ती पहिली टीम असेल.


आरसीबीकडून विराट कोहलीने ९ सामन्यांत सर्वाधिक ३७९ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत भुनेश्वर कुमारने यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ९ सामन्यांत १७ विकेट्स घेत आरसीबीच्या गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. तसेच लखनऊकडून पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवने चांगली चमक दाखवली आहे. त्याने ९ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियसंघाचा कर्णधार मिचेल मार्शने लखनऊसाठी ९ सामन्यांत सर्वाधिक २५६ धावा केल्या आहेत.


आरसीबीला मोठा फटका


इंग्लंडचा फिल सॉल्ट आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीकडून खेळत होता. पण दिल्ली विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. यामुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या गैरहजरीत जेकब बेथेलला विराट कोहलीसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी संधी दिली जात आहे. याआधी त्याला संधी देण्यातली होती. पण तो अपयशी ठरला.


हेड टू हेड


आयपीएलमध्ये याआधी आरसीबी आणि लखनऊमध्ये सात सामने झाले आहेत. यात आरसीबीने लखनऊचा पाच वेळा पराभाव केला आहे, तर लखनऊला दोन वेळा आरसीबीला हरवण्यात यश आले आहे.


कशी असेल खेळपट्टी ?


आयपीएलचा ५० वा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियवर खेळला जाणार आहे. या मैदानावर गोलंदाजाना मदत मिळण्याची शक्यता आहे. विशेषत:फिरकी गोलंदाजांसमोर या मैदानावर खेळणे कठीण जाणार आहे. यामुळे हा सामना कमी धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे.


एलएसजी विरुद्ध आरसीबी संभाव्य प्लेइंग इलेव्हन


लखनौ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मार्कराम, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, मोहसीन खान, आवेश खान, प्रिन्स यादव. इम्पॅक्ट प्लेयर : मणिमरण सिद्धार्थ, दिग्वेश सिंग राठी, मयंक यादव, शाहबाज अहमद, अब्दुल समद



रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवुड. इम्पॅक्ट प्लेयर : रसिक सलाम दार, जॉर्डन कॉक्स, मंगेश यादव, विकी ओस्तवाल, व्यंकटेश अय्यर

Comments
Add Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214