बारामतीत 'दादां'ची परंपरा आता 'जय'च्या हाती

पवारांच्या 'जनता दरबारा'ला पुन्हा गजबज; अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत जय पवारांचा लोकांशी थेट संवाद


मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता पवार कुटुंबीयांनी कंबर कसली आहे. अजितदादांची अत्यंत लोकप्रिय असलेली 'जनता दरबारा'ची परंपरा आता त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी पुढे नेण्यास सुरुवात केली असून, बारामतीत आता नव्या 'दादां'ची सक्रियता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


अजित पवार हे बारामतीतील नागरिकांच्या समस्या जागेवरच निकाली काढण्यासाठी नियमितपणे जनता दरबार भरवत असत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागेवरच आदेश देऊन सामान्यांची कामे मार्गी लावण्याची त्यांची कार्यशैली ही त्यांची ओळख होती. दादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला असला, तरी जनसंपर्काचा हा महत्त्वाचा दुवा काहीसा विरळ झाला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी जय पवार आता दर गुरुवारी बारामती येथील 'सहयोग' या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत.


या जनता दरबारात बारामतीसह आसपासच्या तालुक्यांतील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारी घेऊन येत आहेत. जय पवार नुसते समस्या ऐकूनच घेत नाहीत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे. अजितदादांच्या निधनानंतर पुन्हा एकदा 'सहयोग'वर नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

राजकीय पुनरुत्थानाचे संकेत?


नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर जय पवार यांनी आपला सामाजिक आणि राजकीय वावर वाढवला आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि आता थेट 'जनता दरबार' यामुळे जय पवार हे भविष्यात बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.