Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा जाऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे बुधवारी ६ मे २०२६ रात्री आढळून आले आहे. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी ६ मे २०२६ रोजी रात्री १० वाजेपासून युद्धपातळीवर सुरू आहे. दुरुस्तीच्या कामाचे स्वरूप मोठे असल्याने गुरूवारी ७ मे २०२६ रोजी ही कामे सुरूच आहेत. परिणामी, ‘डी’, ‘ई’ आणि ‘जी दक्षिण’ विभागांतील काही भागांचा पाणीपुरवठा शुक्रवार, ८ मे २०२६ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे तर काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. संबंधित विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, अशी आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारा परिसर




  1. डी विभाग: लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे. बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, ग्रँट रोड (पूर्व), बालाराम स्ट्रीट, डॉ. डी. बी. मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, फालकलॅड रोड, पश्चिम रेल्‍वे, मुंबई सेंट्रल स्‍थानक ( ८ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील), ठाकूरद्वार, एम. के. रोड, आर. आर. रोड, जे. एस. एस. रोड, खाडिलकर रोड, गिरगाव रोड, ह्यूजेस रोड, बाबुलनाथ रोड, चौपाटी रोड, एम. पी. मिल्स कंपाऊंड, बी. बी. नकाशे मार्ग, ताडदेव, आंबेडकर नगर वसाहत, केशवराव खाड्ये मार्ग (दक्षिण)

  2. ई विभाग : एम.एस.अली मार्ग, बेलासीस मार्ग, कामाठीपुरा, शंकरराव पुपला मार्ग, शुक्‍लाली स्‍ट्रीट, मानाजी राजुजी मार्ग, मोरलॅड मार्ग, आग्रीपाडा मार्ग, सातरस्‍ता जंक्‍शन, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, एम.ए. मार्ग, डॉ. आनंदराव नायर मार्ग, नायर रूग्‍णालय, कस्‍तुरबा रुग्णालय, जगजीवन राम रूग्‍णालय, वॉक्‍‍हार्ड रूग्‍णालय

  3. जी दक्षिण विभाग : सातरस्‍ता परिसर, जे. आर. बोरीचा मार्ग, साने गुरुजी मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग, धोबीघाट, जी.बी सपकाळ मार्ग, डॉ. ई. मोझोसमधील काही परिसर

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर