SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी आठ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी आणि १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल आठ दिवस लवकर जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९४.१० टक्के लागला होता.



दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार 8 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी दिली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.



1) https://results.digilocker.gov.in


2) https://mahahsscboard.in


3) https://sscresult.mkcl.org


परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.



ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म