Nashik News : सिटी लिंक बस चालकाला रिक्षा चालकाकडून मारहाण; कर्मचाऱ्यांचे बस बंद आंदोलन , प्रवाशांना फटका

Nashik News : नाशिक रोड बस स्थानक परिसरात (Nashik Road Bus Station) सिटी लिंक बस ड्रायव्हरला रिक्षा चालकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या मारहाणीनंतर सिटी लिंक बस चालकांनी अचानक बस बंद आंदोलन पुकारले आहे. अचानक बस बंद केल्यामुळे सकाळच्या वेळेस घाईत असलेल्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहे.



नेमकी काय घटना घडली ?


नाशिक रोड (Nashik Road) येथे सिटी लिंकची बस स्थानकातून बाहेर काढताना हा वाद निर्माण झाला. रिक्षाचालकांनी बस चालकाला दमदाटी करत वाद घातला पुढे हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. रिक्षा चालकांच्या टोळक्याने बस चालक लक्ष्मण नायकर यांना थेट मारहाण केली. या घटनेनंतर संतापलेल्या सिटी लिंक बस चालकांनी बसेस आहे त्या ठिकाणी रस्त्यात सोडून बंद पुकारला. गेल्या दीड तासापासून सिटी लिंक बस चालकांनी बंद पुकारल्यामुळे परिसरातील वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे.


जो पर्यंत संबंधित रिक्षा चालकावर कारवाई होत नाही तो पर्यंत बस धावणार नसल्याची भूमिका बस चालकांनी घेतली आहे. तर दुसरीकडे नाशिक रोड स्थानक (Nashik Road Bus Station) परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. या घटनेनंतर नाशिक रोडला जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. तर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या काही बसेस शहर पोलिसांनी काही प्रमाणात हलवल्या आहे. दरम्यान, या घटनेनंतर सिटी लिंकचे अधिकारी, बस चालक, युनियनचे पदाधिकारी हे नाशिक रोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) दाखल झाले असून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.



निदा खान ताब्यात


दुसरीकडे नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील (Nashik TCS Company) बलात्कार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या दोन गुन्ह्यातील संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून ताब्यात घेतले आहे. २५ मार्च रोजी देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यापासून निदा पसार होती. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. निदा खानला पकडण्यासाठी नाशिक पोलीस बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होते. अखेर तिला पकडण्यात यश आले. आज तिला नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात येईल.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण