Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने अधिकृत एक्स्चेंज फायलिंगद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या निधनाने केवळ पुणे शहरच नव्हे, तर जागतिक ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर क्षेत्रात शोककळा पसरली आहे.


उद्योगा सोबत सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान


रवी पंडित यांचे कार्य केवळ उद्योग क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ते कीर्तने आणि पंडित. या अग्रगण्य चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणी यांसारख्या संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.ज्ञान प्रबोधिनी चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. तसेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या माध्यमातून शाश्वत विकास आणि धोरणात्मक संशोधनाला त्यांनी प्रोत्साहन दिले.


शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी


रवी पंडित हे चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेत सुवर्णपदक विजेते होते. त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून उच्च शिक्षण घेतले होते. त्यांच्या बौद्धिक योगदानामुळे त्यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ‘फेलो’ म्हणूनही गौरवण्यात आले होते.त्यांचे उडी मारण्यापासून ते पोल-व्हॉल्टिंगपर्यंत हे पुस्तक अनेक नवोदित उद्योजकांसाठी मार्गदर्शक मानले जाते.


पुण्याच्या विकासासाठीही पुढाकार


पुण्याला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी त्यांनी जनवाणी या संस्थेद्वारे कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. तंत्रज्ञान आणि सामाजिक मूल्यांचा समन्वय त्यांच्या कामात नेहमी दिसून येत असे.





उद्योगविश्वाने दूरदर्शी नेतृत्व गमावले


या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार .यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली. माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात रवी पंडित यांनी दिलेले योगदान मोठे असून त्यांच्या निधनाने उद्योगविश्वाने एक संवेदनशील आणि दूरदर्शी नेतृत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.रवी पंडित यांच्या निधनामुळे पुणे शहरासह देशातील उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात