दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष टपाल तिकीट जारी होणार

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली दिली जाणार आहे. यासंदर्भात, शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून, लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या मागणीबाबत केंद्र सरकारकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाल्याची माहिती शेवाळे यांच्याकडून देण्यात आली.भारतीय टपाल विभागातील उप महासंचालक कार्यालयाकडून शेवाळे यांना प्राप्त झालेल्या पत्रात लिहिले आहे की, फिलाटेल (संग्रह) विभागाच्या सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यामुळे लवकरच अशा प्रकारचे तिकीट जारी केले जाण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिलेल्या लेखी निवेदनात शेवाळे यांनी म्हटले होते की, २७ जानेवारी रोजी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती देशभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वंदनीय बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली द्यावी, ही देशभरातील लाखो चाहत्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीट जारी करून यथोचित सन्मान करावा.





जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट जारी करून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी आदरांजली द्यावी, अशी मागणी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन, फिलाटेल समितीच्या आगामी बैठकीत सकारात्मक चर्चा केली जाईल, अशा आशयाचे पत्र टपाल विभागाकडून मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच भारतीय टपाल विभागाकडून अशा प्रकारचे विशेष टपाल तिकीट जारी केले जाईल आणि माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांची मागणी पूर्णत्वास येईल, याची मला खात्री आहे. - राहुल शेवाळे, माजी खासदार
- राहुल शेवाळे, माजी खासदार

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने