Nashik TCS Case : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोगाने तयार केलेला ५० पानांहून अधिकचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. या अहवालात आयोगाने २५ हून अधिक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या असून, या शिफारसींनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.


नाशिकमधील या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक लीलाबती यांचा समावेश होता. समितीने १८ व १९ एप्रिल रोजी नाशिकचा दौरा करून पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेतून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.


मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात कार्यस्थळी महिलांची सुरक्षितता, त्यांचा सन्मान आणि न्याय सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. जबाबदारी निश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवतानाच, जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज समितीने अधोरेखित केली आहे.


एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी : दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पोलिसांनी अटक केली असून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, निदा खानला लपवून ठेवण्यात 'एमआयएम'च्या एका नगरसेवकाचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी नगरसेवक मतीन पटेलला ताब्यात घेऊन या प्रकरणात सहआरोपी केले आहे.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत