FIFA World Cup 2026 : केटी पेरी-शकीराचा धमाका! विश्वचषक उद्घाटन सोहळा होणार सुपरहिट एंटरटेनमेंट शो

फिफा वर्ल्ड कप २०२६ (2026 FIFA World Cup) च्या उद्घाटन सोहळ्याची रंगत आता अधिकच वाढली आहे. जागतिक पॉप स्टार केटी पेरी (Katy Perry) हिने २०२६ फिफा विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय शकिरा (Shakira) हिच्या पुनरागमनामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


१२ जून २०२६ रोजी सोफी स्टेडियम (SoFi Stadium) येथे होणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यात केटी पेरी आपली कला सादर करणार आहे. याच दिवशी अमेरिका (United States) आणि पॅराग्वे (Paraguay) यांच्यात स्पर्धेचा उद्घाटन सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे फुटबॉल आणि संगीतप्रेमींसाठी हा दिवस खास ठरणार आहे.



केटी पेरीने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या बातमीला दुजोरा दिला. “२०२६ फिफा विश्वचषक उद्घाटन सोहळ्याचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे,” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी उत्साह व्यक्त केला आहे.



शकीराचं दमदार पुनरागमन :


फुटबॉल विश्वचषक म्हटलं की शकीराचं नाव आपोआप समोर येतं. २०१० विश्वचषकातील तिचं सुपरहिट गाणं Waka Waka (This Time for Africa) आजही जगभर लोकप्रिय आहे. आता शकीरा पुन्हा एकदा फिफा मंचावर परतणार असून तिने ‘डाय डाय’ नावाचं नवीन गाणं रिलीज करण्याची घोषणा केली आहे.


या गाण्यात नायजेरियन संगीत स्टार बर्ना बॉय (Burna Boy) देखील सहभागी असणार आहे. त्यामुळे या गाण्याबद्दल संगीतविश्वात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.



अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांचा जलवा :


उद्घाटन सोहळ्यात केवळ केटी पेरी आणि शकीराच नव्हे, तर अनेक जागतिक कलाकारही रंगत वाढवणार आहेत. यामध्ये फ्युचर (Future), कोरियन पॉप स्टार लिसा (Lisa) यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश असणार आहे.



तर ११ जून रोजी मेक्सिको सिटी (Mexico City) येथे होणाऱ्या कार्यक्रमात जे बाल्विन, बेलिंडा, अलेजांद्रो फर्नांडीझ आणि लोकप्रिय बँड Maná सादरीकरण करणार आहेत.



आतापर्यंतचा सर्वात मोठा FIFA World Cup :


२०२६ चा फिफा विश्वचषक हा इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक ठरणार आहे. ही स्पर्धा ११ जून ते १९ जुलै दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे.


या स्पर्धेत प्रथमच ४८ संघ सहभागी होणार असून एकूण १०४ सामने खेळले जाणार आहेत. अंतिम सामना न्यू जर्सी येथे खेळवला जाणार आहे. फुटबॉलचा थरार, संगीताचा जल्लोष आणि जागतिक सुपरस्टार्सची उपस्थिती यामुळे २०२६ फिफा विश्वचषक हा केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर जगातील सर्वात मोठा एंटरटेनमेंट फेस्टिव्हल ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या