Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण, आजचे दर काय ?

Gold-Silver Price Today : सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दागिने, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू करता यावी असं अनेकांचं स्वप्न असतं. पण गेल्या काही काळात सोने आणि चांदीचे दर इतके वाढले आहेत की इच्छा असूनही लग्नात सोने चांदीच्या वस्तू , दागिने करता येत नाही. दरम्यान, सोन्याच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे , त्यामुळे तुम्हांला जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा दागिने घ्यायचे असतील तर आज चांगली संधी आहे.


शनिवारी सकाळी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर किंचित कमी झाले आहेत. मात्र, चेन्नईमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार ८७० रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार ६७० रुपयांना विकले जात आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली होती आणि दर १ लाख ५५ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला होता. (Gold-Silver Price Today )



आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सध्या जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा दर ४,७२१ डॉलर प्रति औंस इतका आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. (Gold-Silver Price Today )


प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर


दिल्ली
२२ कॅरेट : १,४०,०९० रुपये
२४ कॅरेट : १,५२,८७० रुपये


मुंबई
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,६७० रुपये


चेन्नई
२२ कॅरेट : १,४१,०३० रुपये
२४ कॅरेट : १,५३,८५० रुपये



अहमदाबाद
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,७२० रुपये


कोलकाता
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,६७० रुपये


हैदराबाद
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,६७० रुपये


चंदीगड
२२ कॅरेट : १,४०,०९० रुपये
२४ कॅरेट : १,५२,८७० रुपये


दरम्यान, चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ९ मे रोजी सकाळी चांदीचा दर प्रति किलो २ लाख ७५ हजार १०० रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर ८१.१४ डॉलर प्रति औंस इतका नोंदवण्यात आला आहे. एक दिवस आधी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात २०० रुपयांची घसरण होऊन तो २ लाख ६१ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आला होता. मात्र, आता पुन्हा चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि