ISO Nomination : महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला आयएसओ नामांकन

मुंबई : मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट कामांबद्दल आयएसओ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅडर्डायझेशन) नामांकन मिळाले. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभागाने हे यश मिळविले आहे. जनसंपर्क विभागामध्ये महाराष्ट्रात आयएसओ नामांकन मिळविणारा महापारेषणचा जनसंपर्क विभाग पहिला ठरला आहे.



महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत. ‘महापारेषण समाचार’ या गृहमासिकेमध्ये क्यू-आर कोड, पॉडकास्ट आणि डिजिटल संवाद तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती सादरीकरणाला आधुनिक रूप दिले. जाहिराती आणि जनजागृती मोहिमांमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणारा हा विभाग राज्यातील अग्रगण्य विभाग म्हणून ओळखला जातो.


विशेष म्हणजे, जनसंपर्क क्षेत्रात तब्बल १५ पुरस्कार पटकाविण्याचा विक्रमही महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने आपल्या नावावर केला आहे. आयएसओ नामांकनामुळे महापारेषणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


दरम्यान, महापारेषणच्या जनसंपर्क विभागाचे आयएसओ नामांकनचे प्रमाणपत्र लेखानिबंधक विजयकुमार स्वामी यांनी अपर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजू गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, जनसंपर्क विभागाचे श्रीकांत जाधव उपस्थित होते.


जनसंपर्क विभाग अग्रेसर : डॉ. संजीव कुमार


महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी यशाचे संपूर्ण श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. विशेषतः सोशल मीडियाव्दारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, टेलिग्राम, थ्रेड्स) जनसंपर्क विभागाने महापारेषणची भूमिका लोकांसमोर सकारात्मकपणे ठळकपणे मांडली. भविष्यातही, महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण अभिनव कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.


महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत. ‘महापारेषण समाचार’ या गृहमासिकेमध्ये क्यू-आर कोड, पॉडकास्ट आणि डिजिटल संवाद तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती सादरीकरणाला आधुनिक रूप दिले. जाहिराती आणि जनजागृती मोहिमांमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणारा हा विभाग राज्यातील अग्रगण्य विभाग म्हणून ओळखला जातो.विशेष म्हणजे, जनसंपर्क क्षेत्रात तब्बल १५ पुरस्कार पटकाविण्याचा विक्रमही महापार

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'शिप ब्रेकिंग पॉलिसी' अंतर्गत २०३० पर्यंत ७० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य; मंत्री नितेश राणे यांची माहिती

जहाज बांधणी, जहाज तोडणीसाठी स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य मुंबई : भारताच्या जहाज बांधणी आणि जहाज

Ashwini Bhide : आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात आता खरे मुखवटे समोर येतील!

- मंत्री नितेश राणे; भगिनीला न्याय मिळाला याचा आम्हाला आनंदच मुंबई : दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

Ambernath railway station video : अंबरनाथ स्थानकात थरार! लोकल ट्रेन येण्यापूर्वी प्रवाशांनी दिव्यांगाला रुळावरून ओढले आणि पुढे...

अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सुरक्षेच्या चिंतेत भर घालणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना

Nalasopara Name Change : नालासोपाराचं नाव बदलण्याची मागणी; ‘शूरपरक’ नावासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रस्ताव

मुंबई : नालासोपाराचे प्राचीन नाव ‘शूरपरक’ पुन्हा बहाल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. वसई-विरार शहर

EatClub Brands FSSAI License Suspended : EatClub Brandsच्या किचनमध्ये नेमकं काय आढळलं? FDAच्या तपासणीत धक्कादायक त्रुटी; FSSAI परवाना निलंबित

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील EatClub Brands Private Limited या खाद्य आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA)