Nashik Crime : किरकोळ वादातून सलून चालकाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ

Nashik Crime : नाशिकमधील आडगाव नाका परिसरातील (Aadgaon Naka Area) मधुर मिलन स्वीट्ससमोर आज पहाटे हत्येचा थरार रंगला. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका सलून चालकाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. जयवंत यशवंत पवार (४५) असे मृताचे नाव असून ते जुन्या नाशिकमधील रहिवासी आहे. तर संशयित आरोपीचे नाव राजा काकवीपुरे असे असून तो घटनेनंतर पसार झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयवंत पवार यांचे अमरधाम रोडवर ‘तन्मय मेन्स पार्लर’ नावाचे सलून आहे. शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास ते घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरु केली. (Aadgaon Naka Area) शोधाशोध सुरू असतानाच, ते मित्र विनोद आगळे उर्फ वस्ताद यांच्यासोबत असल्याचे समजले. पहाटे ३:३० च्या सुमारास जयवंत पवार आणि विनोद आगळे आडगाव नाक्यावरील मधुर मिलन स्वीट्स जवळ आले. त्याचवेळी तेथे टायर पंक्चरच्या दुकानाजवळ संशयित आरोपी राजा काकवीपुरे हा दारू पीत बसलेला होता. यावेळी विनोद आगळे आणि राजा यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. जयवंत पवार यांनी मध्यस्थी करत आरोपीला हटकले असता, वादाचे रूपांतर झटापटीत झाले. (Nashik Crime News)



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, झटापट सुरू असताना संशयित राजा काकवीपुरे याने आपल्या बुटात लपवून ठेवलेला धारदार चाकू बाहेर काढला. त्याने केलेला पहिला वार हुकला, मात्र दुसरा वार जयवंत पवार यांच्या उजव्या बगलेखाली छातीवर वर्मी बसला. वार इतका भीषण होता की पवार रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले. घटनेनंतर आरोपीने परिसरात दहशत माजवत तेथून एका दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्या गाडीवर बसून पळ काढला. घटनास्थळी उपस्थित मित्रांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून पवार यांना अपोलो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. (Nashik Crime News)



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी (Adgaon Police) घटनास्थळी धाव घेतली. मृत जयवंत यांच्या पत्नी गिता पवार (Gita Pawar) यांच्या फिर्यादीवरून संशयित राजा काकवीपुरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पथके (Adgaon Police) रवाना करण्यात आली आहेत. मृत जयवंत यांच्या पश्चात पत्नी गिता पवार, मुलगा तन्मय आणि आई असा परिवार आहे.


 
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''