Rohit Sharma New Show : “आता कोणीही गार्डनमध्ये फिरणार नाही!” रोहित शर्माचा धमाकेदार एंटरटेनमेंट डेब्यू; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी पिक्चर्स ने रोहित शर्माच्या बहुप्रतिक्षित एंटरटेनमेंट डेब्यूची घोषणा करत एक खास टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून रोहितचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

टीझरमध्ये रोहित शर्मा चाहत्यांच्या प्रचंड गर्दीने वेढलेला दिसतो. यावेळी चाहते त्याच्याकडे त्याची प्रसिद्ध ओळ “कोणीही गार्डनमध्ये फिरणार नाही” पुन्हा पुन्हा म्हणण्याची मागणी करताना दिसतात. मैदानावर सहज बोललेली ही ओळ काही दिवसांतच सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली होती आणि आता तीच ओळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.




या संपूर्ण क्रेझवर प्रतिक्रिया देताना रोहित शर्मा मजेशीर अंदाजात म्हणतो, “दोन ओळी काय बोललो, तर इतकं व्हायरल झालं… आता माझा पूर्ण शो आला तर काय होईल?” रोहितचा हा संवाद चाहत्यांना विशेष भावला असून टीझरला मोठा प्रतिसाद मिळत आहे.





हास्य, करिष्मा आणि मनोरंजनाचा तडका असलेला हा टीझर पाहून रोहित शर्मा केवळ क्रिकेट मैदानावरच नव्हे, तर मनोरंजन विश्वातही धमाल उडवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आपल्या खास विनोदबुद्धी आणि सहज व्यक्तिमत्त्वामुळे तो छोट्या पडद्यावरही प्रेक्षकांची मनं जिंकणार, अशी चर्चा रंगली आहे. हा आगामी एंटरटेनमेंट शो Sony Entertainment Television आणि SonyLIV वर प्रदर्शित होणार असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. सध्या मात्र रोहित शर्माच्या या नव्या इनिंगची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’