Narender Modi : हेलिकॉप्टर घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी केली एकनाथ शिंदेंची विचारपूस

मुंबई : खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी गुरुवारी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विचारपूस करीत, त्यांना यापुढे हवाईप्रवास करताना काळजी घ्या, असा वडिलकीचा सल्ला दिला.





पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री शुवेंदु अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे शनिवारी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अभिवादन करत पुढे सरकत असताना अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ थांबत त्यांच्याशी चर्चा करताना दिसले. यावेळी त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र मोदी यांनी शिंदे यांच्या बाबतीत हेलिकॉप्टरमधील प्रवासादरम्यान झालेल्या या घटनेबाबतची बातमी कानावर आली असल्याचे सांगत शिंदे यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच यापुढे हवाईप्रवास करताना अधिक काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने