Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ तयारीला गती , कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या (Simhastha Kumbh Mela 2027) तयारीला गती देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) अंतर्गत आढावा बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रशासकीय व पायाभूत सुविधा विषयक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही ऑनलाइन बैठक पार पडली. प्रशासनिक तयारी, आपत्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, डिजिटल सुविधा आणि शहर सौंदर्यीकरण या विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.



आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी १५ हजार स्वयंसेवक


बैठकीत कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयासाठी जुन्या जिल्हा परिषद इमारतीचा (Old Zilla Parishad Building) भाडेतत्त्वावर वापर करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी दरमहा १८ लाख रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे कुंभमेळा नियोजन आणि समन्वय प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी १५ हजार स्वयंसेवकांना (Volunteer) प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावास तसेच स्वारस्य व्यक्त करण्यासाठी सूचना प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली. कुंभमेळ्यादरम्यान गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि नागरिकांना सहाय्य करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात येणार आहे.(Simhastha Kumbh Mela 2027)


जनार्दन स्वामी मठ (छत्रपती संभाजीनगर रस्ता) ते लक्ष्मीनारायण मंदिर पूलमार्गे ड्रीम सिटी चौकापर्यंत ३० मीटर रुंदीच्या विकास रस्त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या रस्त्यामुळे वाहतूक व संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. प्रस्तावित साधुग्रामासाठी पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये पंपिंग यंत्रणा पुरवणे, बसवणे आणि कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.


2


'पेंट माय सिटी’ अभियान राबविण्यास मान्यता


याशिवाय नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांमध्ये ‘पेंट माय सिटी’ (Paint My City) अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि जनसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कुंभमेळा २०२७(Simhastha Kumbh Mela 2027) साठी अधिकृत संकेतस्थळ तसेच अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.


या ऑनलाइन बैठकीस कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, उपआयुक्त योगेंद्र चौधरी, नाशिक महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल, जिल्हा परिषद प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण